Sunday, October 12, 2025

जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार आयोजन करते. राज्यात सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक चे आयोजन दि.१० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांचे दि.२७.८.२०२५ चे पत्रान्वये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD मध्ये करण्यात आले असून तो विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर NYF-VBYLD-२०२६ चे आयोजन युवा कार्यक्रम व खेळमंत्रालयाकडून केले जाणार आहे, ज्यामध्ये १५ ते २९ वयोगटातील युवकांचा सहभाग अपेक्षित आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी आदर्श विद्यानिकेतन, पेठवडगाव, ता. हातकणंगले येथे होणार आहे. यामध्ये खालील प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 🎯 स्पर्धांचे प्रकार (Cultural & Innovation Track) १. वक्तृत्व २. कथालेखन ३. चित्रकला ४. लोकनृत्य (गट) ५. लोकगीत (गट) ६. कवितालेखन ७. नवोपक्रम नवोपक्रम (विज्ञानप्रदर्शन) • विज्ञान व तंत्रज्ञान विषयक अभिनव कल्पना सादर कराव्यात. • सदर स्पर्धा सांघिक प्रकारात होणार असून संघात जास्तीत जास्त ५ सदस्य असतील. • विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी आवश्यक असणा-या सुविधा (विद्युत जोडणी, अतिरिक्त टेबल्स इ.) स्पर्धकांनी दि. २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत dsokop@gmail.com या मेलवर कळवावी. • हॅकॅथॉन - १. प्लॅस्टिकमुक्ती २. डिजीटल प्रशासनातील समस्या या संकल्पनांवर आधारित हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात येईल. सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक असून नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment