जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राबवले जाणारे विविध उपक्रम :-
क्रीडा दिन
मेजर ध्यानचंद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून
त्यांच्या जन्मदिन २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याबाबत केंद्रशासनाने
सर्व राज्यांना १९९४ -९५ पासून निर्देशित केलेले आहे हे आपणास ज्ञात
आहेच . दि २९ ऑगस्ट २०१३ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यासाठी या
दिवशी विविध खेळाच्या स्पर्धा आयोजत कराव्यात . विशेषत: अर्ध मार्रेथोन ,रोडरेसेस,हॉकी
,कबड्डी ,सायकलिंग ,रर-सीखेच इ . खेळापैकी उपलब्ध सुविधानुसार शक्य तितक्या खेळांच्या
स्पर्धा आयोजित कराव्यात . या सोबत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याबाबत नमुना आराखडा
पुठीलप्रमाणे:-
गाव पातळी :- जिल्हाभर सर्व
शाळांमधून प्रभात फेरीचे आयोजन करावे आणि प्रमुख मैदानावर प्रभात फेरीचे विसर्जन करून
तेथे सामुदायिक कवायत सांघिक खेळ व स्पर्धात्मक खेळ शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत
व क्रीडा संस्थानच्यावतीने आयोजित करावे .
तालुकास्तर :- तालुका मुख्यालयाच्या
ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करावे,विविध स्पर्धांचे आयोजित करून तहसीलदार
,मा.आमदार ,लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत क्रीडा धोरण व क्रीडा प्रसाराबाबत
चर्चा सत्र आयोजित करणे
जिल्हास्तर :-जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयामार्फत दि २९ ऑगस्ट २०१३ रोजी जिल्हास्तर क्रीडा दिनाचे आयोजन
करण्यात येणार आहे त्याविषयी अधिक माहिती क्रीदादिनापुर्वी ८ दिवस अगोदर या कार्यालयातून
मिळेल
क्रीडा सप्ताह
दि १२ ते १८ डिसेंबर २०१३
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार
दरवर्षी १२ ते १८ डिसेंबर हा आठवडा क्रीडा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. शाळा
महाविद्यालये व समाजात क्रीडा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक व्यक्तीचे
दररोज एक तास तरी व्यायाम करावा त्यामुळे आरोग्य चांगले राहते मन उत्साही होते . हा
सुज्ञ दृष्टीकोन ठेऊन क्रीडा सप्ताह साजराकेला जातो .
दरवर्षीप्रमाणे आपल्या
प्रशालेत या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करावे व आपल्या व्यवस्थापनाच्या सोयीनुसार दररोज
एक ते दोन तास क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळे उपक्रम राबवावेत किंवा वार्षिक स्नेहस्मेल्नाच्या
स्पर्धा व इतर उपक्रम याच सप्ताहात घेऊन शासनाच्या या स्तुत्य उपक्रमांना प्रोत्साहन
द्यावे आपण करत असलेल्या कार्यवाहीची प्रसिद्धी वृत्तपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात करावी
.
क्रीडा सप्ताहातील कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आखण्यात यावी
१) १२ डिसेंबर अ )विद्यार्थांचे
त्या त्या परिसरात संचलन
ब )विद्यार्थांचे
समुहगायन
क )राष्ट्रभक्तीपर
गायन
ड )उदघाटन
समारंभ(क्रीडा क्षेत्रातील उच्च पदस्थ /मान्यवर व्यक्तींचे हस्ते)
२) १३ डिसेंबर अ)भारतीय
,पारंपारिक व्यायाम करणे
ब)खेळाचे
प्रदर्शन
क)वाङ्मय
व चित्रपट
ड
)लोकनृत्य
३) १४ डिसेंबर अ)विविध
खेळांचे सामने
४) १५ डिसेंबर अ)क्रीडा
क्षेत्रातील तज्ञ / नामांकित खेळाडूंचे चर्चासत्र
५) १६ डिसेंबर अ)भारतीयम
कार्यक्रमाचे आयोजन
६) १७ डिसेंबर अ)रोडरेस / सायकल
शर्यतीचे आयोजन
७) १८ डिसेंबर अ)समारोप समारंभ(क्रीडा
क्षेत्रातील उच्च पदस्थ /मान्यवर व्यक्तींचे हस्ते)
ब) सप्ताहातील
विविध कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिक वितरण
राष्ट्रीय युवा दिन-युवा
सप्ताह
केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार
प्रतिवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला
व तेथून पुढे १९ जानेवारी पर्यंत युवा सप्ताहचे आयोजन संपूर्ण भारतामध्ये करण्यात येते
. सदर राष्ट्रीय युवा दिन-युवा सप्ताह कशाप्रकारे साजरा करावा त्यासंबंधीच्या कार्यक्रमाची
मार्गदर्शक रूपरेषा माहितीसाठी व कार्यवाहीसाठी
१) १२ जानेवारी
अ)स्वामी विवेकानंद जयंती
ब)स्वामी विवेकानंदाची शिकवण व तत्वज्ञान
२) १३ जानेवारी
अ)राष्ट्रीय विचार सरणीवर सामुदायिक गीतगायन
३) १४ जानेवारी
अ)समाजसेवा दिन
ब) युवकांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा
१)राष्ट्रीय उत्सवात युवकांचे
कार्य
२)उद्याचा युवक एकता
मेळावा
४) १५ जानेवारी
अ)शारीरिक क्षमता दिन
ब)राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षित विद्यार्थ्याच्या सह्कार्याने
समाजसेवा कार्य
५) १६ जानेवारी
अ)शांततेसाठी युवक दिन
ब)गाव / तालुका / जिल्हा क्रीडा स्पर्धा ग्रामीण भागातील विविध
खेळ व स्पर्धा
६) १७ जानेवारी
अ)सुटीच्या कालावधीत शिक्षण घेतलेल्या युवकांच्या कलागुणांचे प्रदर्शन
७) १८ जानेवारी
अ)वादविवाद स्पर्धा , मेळावा उद्देश-शांततेसाठी युवक दिनास योग्य असे खेळ
८) १९ जानेवारी
अ)युवकांच्या आदर्शासाठी निगडीत चित्रपट प्रदर्शन
ब)मान्यवर व्यक्तींचे युवकांसाठी भाषण
क)युवक सप्ताह निमित्त झालील्या कार्यक्रमाची बक्षीस समारंभ
कोल्हापूर जिल्हातील शाळा
/ महाविद्यालये / मंडळे यांनी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये / परिसरात राष्ट्रीय युवा दिन-युवा सप्तातर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे
आयोजन करून सप्ताह साजरा व त्याचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिनांक २७/१
/२०१४ पर्यंत पाठवावा
निबंध
लेखन व वक्तृत्व स्पर्धा
महाराष्ट्र शासन, क्रीडा
व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे -१ यांच्या वतीने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ग्रामीण भागात युवक कल्याण
उपक्रमाचा विस्तार योजनेअंतर्गत जास्तीत जास्त युवकांना विविध उपक्रमात सह्भागी करून
त्याच्या सर्वागीण विकासासाठी व त्याच्या सुप्त गुणांच्या वाढीसाठी स्पर्धा उपलब्ध
करून देऊन त्याद्वारे राष्ट्रोन्नती व सामाजिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने प्रती
वर्षी दिनांक १२ ते १९ जानेवारी
या राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाच्या कालावधीत १५ ते ३५ वयोगटात विद्यार्थी
व विद्यार्ठीत्तर युवक युवतींसाठी निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन तालुका पातळीवर
करण्यात येते व त्यानंतर जिल्हापातळीवर प्रतिवर्षी करण्यात येते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या तालुका
केंद्राच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य हे केंद्रपातळीवरील
निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करतील. केंद्रपातळीवरील निबंध लेखन व वक्तृत्व
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम,द्वतीय ,तृतीय क्रमांक संपादन करणा-या युवक युवतींना रोख
बक्षीस व प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल
केंद्रपातळीवरील / जिल्हास्तरीय स्पर्धेचे
ठिकाण,दिनांक,वेळ व विषय इत्यादी बाबतची माहिती दिनांक १ ते ९ जानेवारी २ ० १ ४ या
कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय,कोल्हापूर येथे मिळेल .
मुख्याध्यापक / प्राचार्य/ अध्यक्ष / सचिव यांनी आपल्या शाळा / महाविद्यालयातील / मंडळातील
व परिसरातील युवक युवतींना निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेबाबत माहिती द्यावी व स्पर्धेमध्ये
सह्भागी करून व या शासकीय स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य क्रवे.
No comments:
Post a Comment