Tuesday, November 16, 2021

खेलो –इंडिया युथ गेम्स २०२२

खेलो –इंडिया युथ गेम्स २०२२ सुचना १) केंद्र शासनाच्या वतीने दि ५ ते १४ फेब्रूवारी २०२२ या कालावधीमध्ये ४ थ्या खेलो –इंडिया युथ गेम्स २०२२ चे आयोजन हरियाणा येथे करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. १८ वर्षा आतील मुले व मुली या वयोगटामध्ये एकूण २५ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा यामध्ये होणार आहेत. या पैकी सद्या सांघिक क्रीडा प्रकारातील खो-खो, कबड्डी, (१८ वर्षे मुले आणि मुले) व बास्केटबॉल (१८ वर्षे मुली) या खेळासाठी निवड चाचणी/ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २) दिनांक २०/११/२०२१ - कबड्डी १८ वर्षे मुले –राऊज अकेडमी, गोकुळ शिरगाव, कोल्हपूर दिनांक २१/११/२०२१ - कबड्डी १८ वर्षे मुली –राऊज अकेडमी, गोकुळ शिरगाव, कोल्हपूर ३) दिनांक २०/११/२०२१ – खो-खो १८ वर्षे मुले –बालभारत क्रीडा मंडळ,सुतार मळा, इचलकरंजी दिनांक २१/११/२०२१ – खो-खो १८ वर्षे मुली –बालभारत क्रीडा मंडळ,सुतार मळा, इचलकरंजी ४) दिनांक २०/११/२०२१ – बास्केटबॉल १८ वर्षे मुली –शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर . ५) या स्पर्धेसाठी शाळा/ कॉलेज किंवा क्लब यांचे संघ सहभागी होवू शकतील .आपल्या शाळा, कॉलेज किंवा कल्बच्या लेटर हेडवर आपली प्रवेशिका दि १९/११/२०२१ सायं ०३:०० पर्यंत dsokop@gmail.com वर ईमेल द्वारे पाठविण्यात यावी. प्रवेशिकेचा नमुना सोबत दिलेला आहे. ६) जे खेळाडू शाळाबाह्य आहेत किंवा संघामधून स्पर्धेसाठी सहभागी होवू शकणार नाहीत अशा खेळाडूंना निवडचाचणीची संधी देण्यात येणार आहे. त्यांनीही ठिकाणी आधारकार्ड , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी बोर्ड सर्टीफिकेट) ,जन्मप्रमाणपत्र या पैकी किमान दोन मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रत घेवून उपस्थित रहावे कागदपत्रे घेवून उपस्थित रहावे. ७) या स्पर्धेसाठी दि १ जाने २००३ अथवा त्यानंतर जन्म दिनांक असणारेच खेळाडू सहभागी होवू शकतील. वयोगटामध्ये बसू शकणा-या खेळाडूंनी स्पर्धेच्या ठिकाणी आधारकार्ड , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी बोर्ड सर्टीफिकेट) ,जन्मप्रमाणपत्र या पैकी किमान दोन मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रत घेवून उपस्थित रहावे . ८) कबड्डी स्पर्धेसाठी / निवडचाचणीसाठी येणा-या खेळाडूंनी मॅट शुज घेवून उपस्थित रहावे. ९) स्पर्धेचे आयोजन त्या-त्या खेळाच्या संघटनेच्या नियमानुसार होतील. १०) सहभागी खेळाडूंना कोणत्याही प्रकारचे सहभाग अथवा प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ११) खो-खो व कबड्डी या खेळाच्या जिल्हा- विभाग- राज्य स्पर्धा होतील विजयी संघ संपूर्ण पुढील स्पर्धेस पात्र ठरेल व हारलेल्या संघातील खेळाडू व निवड चाचणीसाठी आलेले खेळाडु यामधून ५ खेळाडूंची विभागस्तरीय निवड चाचणीसाठी निवड केली जाईल. १२) बास्केट बॉल १८ मुली (मुलांच्या स्पर्धा नाहीत) या खेळासाठी जिल्हा- राज्य अशा स्पर्धा होतील विभागस्तर स्पर्धा व विभागस्तर निवडचाचणी होणार नाही . जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी संघ राज्यस्पर्धेसाठी पात्र ठरेल व हारलेल्या संघातील व निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूं मधून ५ खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

No comments:

Post a Comment