Thursday, September 30, 2021

आर्मी स्पोर्ट्स इन्सटीट्युट – बॉईज स्पोर्ट्स कंपनी यांचे करिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करणे बाबत

सुचना पत्र. विषय :- आर्मी स्पोर्ट्स इन्सटीट्युट – बॉईज स्पोर्ट्स कंपनी यांचे करिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करणे बाबत . संदर्भ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे दि २३ सप्टे २०२१ रोजीचे पत्र सुचना :- १. दि ०४/१०/२०२१ रोजी उपस्थितीसाठी येताना आधारकार्ड झेरॉक्स , व फॉर्म –अ घेवून दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे . २. फॉर्म –अ वर खेळाडू कोणत्या खेळासाठी क्रीडा नैपून्य चाचणी देणार आहे हे स्पष्ट नमुद करावे. ३. प्रत्येक खेळ प्रकारासाठी चाचणी प्रकार हे वेगळे आहेत त्या चाचणी प्रकारांचे इंटरनेट वरून माहिती घेवून सराव करावा. ४. दि ०४/१०/२०२१ रोजी फक्त रिपोर्टींग होणार आहे. त्या नंतर दिलेल्या दिनांका नुसार खेळ निहाय चाचण्या घेण्यात येणार आहेत. तथापि काही कारणास्तव वेळापत्रकामध्ये अथवा चाचणी प्रकाराच्या दिनांकात तांत्रिक अडचणीस्तव बदल केला जाऊ शकतो . उदा :- Canadian Beep Test ह्या प्रकाराची चाचणी काही कारणास्तव दिनांक व वेळ बदल होवू शकतो. उपस्थितीच्या दिवशी या बाबत सविस्तर माहिती कळविण्यात येईल. ५. ऑक्टोंबर हिट मुळे उष्मांकाचे प्रमाण वाढू शकते यामुळे खेळाडु सोबत पिण्याचे पाणी, अल्पोपहार , जेवण इ ची काळजी घ्यावी. ६. चाचणी देण्यासाठी खेळाडूंच्या शारीरिक हलचाली व्यवस्थित होवू शकतील असा पोषाख खेळाडूचा असावा. ७. खेळाडूना येण्या-जाण्या बाबतची सोय स्वत: करावी लागेल. ८. कोविड -१९ च्या बाबतच्या सर्व आवश्यक बाबी खेळाडूंनी पाळणे आवश्यक आहेत. ९. क्रीडांगणावर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही पालकांनी आयोजकांसोबत विनाकारण वाद- विवाद करू नये. १०. जिल्हास्तर निवड चाचणीमधून आवश्यक गुण संपादित करणारे विद्यार्थी विभागस्तरी स्पर्धेत पात्र ठरतील . ११. खेळ प्रकारानुसार वयोगट हे देखील बदल आहेत . या चाचण्यासाठी ८ वर्षे वयोगटापासून ते १४ वर्षे वयोगटासाठी या चाचण्या असून दि ०१/०१/२०२२ रोजीचे खेळाडूंचे वय ८ ते १४ वर्षे असणे आवश्यक आहे (१/०१/२०१४ ते ०१/०१/२००८ ह्या व या दरम्यानच्या जन्मदिनांक असणारे खेळाडू या चाचण्यामध्ये सहभागी होवू शकतील.) १२. गुणांकानानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी dsokop.blogspot.com या ब्लॉग स्थळावर प्रकाशित करण्यात येईल. १३. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून वेळोवेळी येणा-या सुचना यानुसार या चाचण्याच्या आयोजनामध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा धिकारी यांचे कडे राहतील .  

6 comments:

  1. निवड यादी कधी लागणार आहे

    ReplyDelete
  2. Selected player list kadi lagnar ahe?

    ReplyDelete
  3. निवड यादी कधी लागणार आहे.

    ReplyDelete
  4. निवड यादी कधी लागणा

    ReplyDelete