Tuesday, December 25, 2018

19 judo camp 2018-19


राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर मा जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग-रायगड याचे खालील पत्राच्या अनुषंगाने होणार आहे तरी आवश्यक कागदपत्रे व साहित्य सह प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहावे




Monday, December 17, 2018

14 Judo National Camp

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक बाबी :- ३ इंग्रजी ओळखपत्रे (जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह) , जन्मदिनांकाचा दाखला (Date of birth Certificate) , गतवर्षीच्या गुणपत्रकाची  प्रत, बोनाफाईट, आधारकार्ड इ. कागदपत्रांच्या ३ प्रती, ४ फोटो . इ.  संपर्क क्रमांक :- ९४२०८४५४३१ श्री घट्याळे सर क्रीडा अधिकारी, अमरावती.





Wednesday, December 12, 2018

Youth Festival 2018-19


जिल्हास्तरीय युवा महोत्सव
वृत्तपत्र टिपणी
          क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . वयोवर्ष  १३ ते ३५ या वयोगटातील युवक युवती यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . या बाबींच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजन करण्यात येणार आहे .
अ.क्र.
स्पर्धात्मक बाब
सहभाग संख्या
वेळ
लोकनृत्य
२०
१५ मिनिट
लोकगीत
०६
०७ मिनिट
एकांकिका (इंग्रजी / हिंदी)
१२
४५ मिनिट
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी)
१५ मिनिट
शास्त्रीय नृत्य
१५ मिनिट
सितार वादन
१५ मिनिट
बासरी वादन
१५ मिनिट
तबला वादन
१० मिनिट
विणा वादन
१५ मिनिट
१०
मृदूंग
१० मिनिट
११
हार्मोनियम (लाईट)
१० मिनिट
१२
गिटार
१० मिनिट
१३
मनिपुरी नृत्य
१५ मिनिट
१४
ऒडिसी नृत्य
१५ मिनिट
१५
भरतनाट्यम
१५ मिनिट
१६
कथ्थक
१५ मिनिट
१७
कुचिपुडी नृत्य
१५ मिनिट
१८
वक्तृत्व
१५ मिनिट

        वरील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा मोहत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील .या स्पर्धा   जिल्हा –विभाग- राज्य – राष्ट्रीय या पद्धतीने आयोजित करण्यात येतील . तरी १३ ते ३५ वयोगटातील ज्या  युवकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दिनांक १५ डिसे २०१८ रोजी स ०८:३० वा आदर्श विद्यानिकेन मिणचे ता हातकणंगले या ठिकाणी  दोन फोटो , आधारकार्ड , जन्मतारखेचा दाखला घेवून उपस्थित रहावे .
संपर्क :- श्री शिवाजी पाटील सर९९२२१८८१८८ , श्री बालाजी बरबडे क्रीडा अधिकारी . ९६७३४५१११५